। म्हसळा । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे माजी म्हसळा तालुका चिटणीस, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा जांभूळ ग्रामपंचायतीचे दीर्घकालीन माजी सरपंच तुकाराम महाडिक यांचे बुधवारी (दि. 2) अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी कै. तुकाराम महाडिक यांच्या जांभूळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत सुप्रिया पाटील, बँकेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.टी. वाघमोडे, तालुका चिटणीस आणि संचालक संतोष पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे, माजी चिटणीस तथा माजी संचालक परशुराम मांदाडकर, पाष्टीचे माजी सरपंच राजाराम धुमाळ, रामचंद्र पोस्टुरे, किसन पवार, अल्लाउद्दिन सनगे, महेंद्र गोरीवले, विश्वास तोडणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.