| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घरातून 40 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. जयमाला रवी कांबळे असे बेपत्ता महिलेचे नाव असून, ती एक मनोरुग्ण आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास राजापाडा, तळोजा येथून त्या बेपत्ता झाल्या आहेत. या महिलेची उंची 4 फुट 2 इंच, रंग सावळा, बांधा मध्यम, चेहरा उभट, टोकदार नाक, अंगात राखाडी रंगाची साडी नेसली असून तिला मराठी भाषा बोलता येते. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास 8655354117 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तळोजा पोलिसांनी केले आहे.