जयचा कला उत्सवात सहभाग

। माणगाव । प्रतिनिधी ।

जय नितीन बडे याने विभागीय कला उत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ऊत्तम सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली आहेत. पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथील इयत्ता नववी वर्गात जय शिक्षण घेत आहे. त्याने पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे संपन्न झालेल्या विभागीय कला उत्सव स्पर्धेमध्ये एकल तबलावादन या कलाप्रकारात पुणे क्लस्टरचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या या सहभागाबद्दल मनोज राऊत तसेच इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. त्याच्या उत्तम सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version