जवाहर नवोदय विद्यालयात आरोग्य तपासणी
|माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 64 विद्यार्थी त्वचा आजाराचे आढळून आल्याने त्यांच्यावर मोफत औषधोपचार करून त्वचा रोगाची विविध करणे व उपाय विद्यार्थांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. श्वेता सुभाष भोनकर तसेच विद्यालयाचे प्रा. किरण इंगळे यांनी आरोग्य शिबिराच्या तपासणीपूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून माहिती दिली.
नवोदय विद्यालयात मुले 249, मुली 201 असे एकूण 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचे प्राचार्य श्री. इंगळे यांना कांही विद्यार्थांना त्वचा आजार असल्याचे लक्षात येताच त्यांनी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांची त्वचा आरोग्य तपसणी शिबिराबाबत कळविले होते. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांनी या पत्राची दखल घेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गोमसाळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून ता. 17 डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर भरवण्यात आले. त्यानुसार सकाळी 10.30 वाजता हे शिबीर नवोदय विद्यालयात घेण्यात आले. त्यावेळी माणगाव तालुका कुणबी समाज उन्नती संघांचे अध्यक्ष सुभाष भोनकर यांची कन्या त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. श्वेता भोनकर, डॉ. नीता हडबे, डॉ. नेहा बाविस्कर, पूजा नांदगावकर, राष्ट्रीय आरोग्य अभियान समीक्षा सपाले, कोमल डाकीवाड, तन्वी काडविकर यांनी विद्यार्थांची तपासणी केली.