। गडब । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत काराव-गडब यांचे विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गडब येथे एच. आर जॉन्सन कंपनीत जिल्हास्तरीय मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जीविका मोकल, ईशा पाटील यांनी विजेतेपद मिळविले.
ग्रामपंचायत काराव-गडब आयोजित मुलीच्या मॅरेथॉन स्पर्धेत 5वी ते 7 वी गटात प्रथम क्रमांक जीविका मोकल कारावी-पेण, द्वितीय क्रमांक काव्या पडवळ हांडीवाडी-पाली, तृतीय क्रमांक ऐश्वर्या पाटील गडब, चतुर्थ क्रमांक शरयु पाटील खारपाले- पेण, 8 वी ते 10 वी गट प्रथम क्रमांक ईशा पाटील देहेन-अलिबाग, द्वितीय क्रमांक सिद्धी म्हात्रे बोरी-पेण, तृतीय क्रमांक आचल पाटील गडब- पेण, चतुर्थ क्रमांक- वृंदा ठाकुर आमटेम- पेण यांनी पटकावला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस दलातील राष्ट्रीय धावपटू विनोद पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
विजेत्या स्पर्धकांना काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, दिनेश म्हात्रे, मनोज म्हात्रे, दिपक कोठेकर, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, सिता पाटील, मुक्ता वाघमारे, मंगेश पाटील, शैलेद्र बंगाले आदी मान्यवरांनी गौरविले.