। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव-गडब यांच्या विद्यमाने जॉन्सन कंपनीत महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिविका मोकल आणि ईशा पाटील यांनी विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषक वितरण काराव ग्रामपंचायतीचे सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दिपक कोठेकर, दिनेश म्हात्रे, सिता पाटील, संध्या म्हात्रे, जॉन्सन कंपनीचे शैलेद्र बंगाले, तनमय सुरावकर, रामचंद्र म्हात्रे, रंविद्र म्हात्रे, मोरेश्वर कडु, रणजित पाटील, मंगेश पाटील, संतोष म्हात्रे आणि अंकुश वाघमारे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत 5 वी ते 8 वी गटात प्रथम क्रमांक जिविका मोकल, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या पाटील, तुतीय क्रमांक दुर्वा तांबोळी तर चतुर्थ क्रमांक निधी कोठेकर हिने पटकावला आहे. तसेच, 9 वी ते 12 गटात प्रथम क्रमांक ईशा पाटील, व्दितीय क्रमांक भार्गवी कोठेकर, तुतीय क्रमांक सुष्टी रोडेकर आणि चतुर्थ क्रमांक तन्वी ठाकुर हिने पटकावला आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ग्रामपंचायतीतर्फे चषक व जॉन्सन कंपनीतर्फे रोख रक्कम तर सहभागी स्पर्धकांना भेटवस्तु देण्यात आली.