पावणेचार लाखांची चोरी

| शिहू | वार्ताहर |

मुंढाणी येथे घराची कौले काढून साधारण 3,76,600 रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. नामदेव घासे हे नेरुळ येथे आपल्या मुलाकडे राहायला गेले होते. त्या दरम्यान घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोराने घराची कौले काढून एक सोन्याची गंथन, सोन्याच्या दोन बांगड्या, कानातील चैन, कानातील कुडी, 50 हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 लाख 76 हजार 600 रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले.

Exit mobile version