इस्कॉन मंदिरामध्ये झुलन यात्रा

। पनवेल । वार्ताहर ।

भगवान श्रीकृष्ण जन्मउत्सव निमित्त खारघर येथील इस्कॉन मंदिरात झुलन यात्रा, भक्तिरस उत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान झुलन यात्रा तर 12 ते 19 ऑगस्ट दरम्यान भक्तिरस श्रावण उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

इस्कॉन मंदिर मध्ये येत्या 12 ऑगस्ट रोजी बलराम जयंती तर 19 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जयंती साजरी करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्मउत्सव निमित्त भक्तिरस कार्यक्रम, आरती, अभिषेक, भजन संध्या, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय भगवंताच्या विविध लीलांचे भाविकांना दर्शन व्हावे यासाठी रासक्रीडा, दांडीया आदि कार्यक्रम बालगोपाळ साजरे करणार आहेत. भक्तांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन मंदिरचे अध्यक्ष सूरदास प्रभुजी यांनी केले.

Exit mobile version