झुंझार युवक मंडळ पोयनाड क्रिकेट स्पर्धा

स्पोर्टी-गो कळंबोली विजयी.

| पोयनाड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय 40 षटकांच्या स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघांनी झुंझार पोयनाड संघावर विजय मिळवला आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पोयनाड संघांनी 40 षटकांमध्ये 8 गडी गमावत 169 धावा फलकावर लावल्या, मधल्या फळीत अजिंक्य कैया यांनी 71, आयुष वढे यांनी 45 धावांचे संघाला योगदान दिले, स्पोर्टी-गो कडून दिव्यांश चौधरी यांनी 4 तर जयंद्र पावसकर, रुद्र खानावकर, यश देवकर, निर्भय यांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला बाद केले. प्रत्युत्तरात स्पोर्टी-गो अकॅडमी संघांनी 170 धावांचे लक्ष 33 व्या षटकांमध्ये 8 फलंदाजांना गमावत पूर्ण केले, दिव्यांश चौधरीने संयमी फलंदाजी करत नाबाद 66 धावा काढल्या, रुद्र खानावकर यांनी 18 धावांचे योगदान दिले, पोयनाड संघाकडून आयुष वढे यांनी 3 गौरांशी सिंगला 2 तर अजिंक्य कैंया यांनी 1 फलंदाज बाद केला.

अष्टपैलू खेळ करणाऱ्या दिव्यांश चौधरीला सामनावीर, अजिंक्य कैंया स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, आयुष वढे व रुद्र खानावकर यांना इमॅर्जिंग प्लेअर आदर्श सिंग आर्यन चौहान यांना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून झुंझारचे सचिव किशोर तावडे, झुंझारचे माजी अष्टपैलू खेळाडू संजय सहसरबुद्धे, सौ.लाखवानी, किशोर गोसावी, नरेंद्र पावसकर, संदीप जोशी, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version