झुंझार युवक मंडळ पोयनाड क्रिकेट स्पर्धा

लावास क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

| अलिबाग । वार्ताहर ।

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. शिरीष पाटील स्मृती चषक ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल 40 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील बी ग्रुपमध्ये लावास क्रिकेट क्लब पनवेल संघांनी तिन्ही साखळी फेरीतील सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बी ग्रुपमध्ये असणार्‍या एसबीसी महाड, भेंडखळ क्रिकेट अकॅडमी आणि पाचूरी क्रिकेट अकॅडमी कामोठे ह्या तिन्ही संघांचा पराभव करून लावास क्रिकेट क्लब पनवेल संघांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्‍चित केली आहे. मंगळवारी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात लावास संघांनी पाचूरी क्रिकेट अकॅडमी संघाचा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारत पाचूरी क्रिकेट अकॅडमी संघांनी 40 षटकांन मध्ये सर्व गडी बाद 176 धावसंख्या उभारली मधल्या फळीतील फलंदाज विराज पाटील यांनी सर्वाधिक 43 तर अर्हम शेख यांनी 28 धावा काढल्या 40 षटकांनच्या समाप्ती नंतर संघाचा डाव 176 धावसंख्येवर आटोपला. सामन्याचा सामनावीर म्हणून अष्टपैलू कामगिरी करणार्‍या स्वराज थारकुडे, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू विराज पाटील,इमर्जिंग प्लेअर आदित्य पांडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन चौहान यांना झुंझारचे सदस्य अजय टेमकर, सचिन पाटील, विरु पाचूरी, आतिष खेडेकर, सुरेंद्र जोशी, रोहित कार्ले, संकेश ढोळे, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version