जिंदल रुग्णालयता आरोग्य शिबर

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या बी.सी.जिंदल रुग्णालय सुकेळी यांच्यावतीने जिंदल रुग्णालयात शुक्रवार 12 व 19 जुलै रोजी दोन वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 रोजी शरीरातील रक्ताचे प्रमाण, 19 रोजी रक्तातील साखरेचे प्रमाण अशी दोन शिबिर होणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरीकांची रक्ताची तपासणी करुन योग्य असे मार्गदर्शन डॉ.गोपाळ परमार करणार आहेत.

तसेच जिंदल रुग्णालयाची सेवा ही गोरगरीबांच्या सेवेसाठी 24 तास सुरू करण्यात आली आहे. विविध आजारांवरती खारघर येथील तज्ञ डॉक्टरांच्या भेटी देखील सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये ह्रदयरोग तज्ञ डॉ.समिर वनकर (प्रत्येक महिन्याचा तिसरा बुधवार), स्त्री रोग तज्ञ डॉ. रोहीणी खेरा भट्ट (महिन्याचा दुसरा चौथा गुरुवार), अस्थिरोग तज्ञ डॉ. शरिफ दुदेकुला (महिन्याचा तिसरा शुक्रवार व चौथा बुधवार), डॉ. नितिश अरोरा (महिन्याचा तिसरा शुक्रवार व चौथा बुधवार), डॉ. आर. जे. गड्डम ( प्रत्येक आठवड्यात बुधवार व शनिवार), मुत्र रोग तज्ञ डॉ. विकास बिशे (महिन्याचा दुसरा बुधवार), बालरोग तज्ञ डॉ. आनंद वागळे. (दर गुरुवारी), दंतरोग तज्ञ डॉ. संकेत म्हात्रे (दर शुक्रवारी), कान,नाक,घसा तज्ञ डॉ.हर्ष गुजराथी (दर शुक्रवार), त्वचारोग तज्ञ डॉ. मंदार माने (दर बुधवारी) आदि डॉक्टरांच्या भेटी जिंदल रुग्णालयात सुरु करण्यात आल्या आहेत.

तरी या सर्व सुविधांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी 9764265472 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाळ परमार यांनी केले आहे.

Exit mobile version