जिंदालचा फिरता दवाखाना

गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर
सुकेळी | वार्ताहर |
जिंदाल कंपनीमार्फत सुरू असलेला फिरता दवाखाना दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आला होता. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्यामुळे पुन्हा एकदा जिंदालचा फिरता दवाखाना गोरगरिबांना सेवा देण्यासाठी तत्पर झाला आहे.या फिरत्या दवाखान्याची सुरुवात नुकतीच करण्यात आली.
सुकेळी परिसरामध्ये बहुतांशी आदिवासी वाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे या विभागामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी जवळ-जवळ 14 ते 15 वर्षांपासून बी.सी.जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय सुरु करण्यात आले. या रुग्णालयात अंत्यंत माफक दरात संपूर्ण ऐनघर पंचायतीमधिल तसेच कंपनी कामगार व आजुबाजुच्या परिसरातील रुग्ण चांगल्या पद्धतीत उपचार घेत आहेत.
त्याचप्रमाणे जिंदाल कंपनीचे चेअरमन डी.पी. जिंदाल यांच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी ऐनघर विभागासह खांब, वाकण, पाली परिसरातील गावांमध्ये फिरता दवाखाना सुरू करण्यात आला होता.
या फिरत्या दवाखान्यामार्फत ऐनघर पंचायतीमधिल गावांसह खांब,वाकण, पाली परिसरातील अनेक गावांमध्ये या फिरत्या दवाखान्याला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Exit mobile version