| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जितेंद्र नाखवा यांना लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि जिद्द यांचे संस्कार त्यांचे आई-वडील रोहिदास नाखवा आणि लीला नाखवा यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणानेच त्याच्या स्वप्नांना दिशा दिली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने हॉटेल इंडस्ट्रीत शेफ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. स्वयंपाकघरातील घाम, मेहनत आणि शिकण्याची ओढ यामुळे त्याने आपल्या कौशल्याची छाप उमटवली. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन मिळवण्यासाठी जितेंद्र नाखवा यांनी स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित हॉस्पिटॅलिटी शिक्षण घेतले आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने भारतात आणि परदेशात जगातील नामांकित हॉटेल ब्रँड्ससोबत काम केले. या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्यात आणि व्यवस्थापन क्षमतेत मोठी भर पडली. सीएमओ अशिया यांच्यावतीने ताज लॅडस् एंड येथे शुक्रवारी (दि.20)आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र नाखवा यांना ‘अशियाज् मोस्ट एडमायर्ड जनरल मॅनेजर 2026′ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या 23 वर्षांच्या अथक परिश्रमांची आणि आतिथ्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती आहे. त्यांच्या या यशामूळे उरणचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.
जितेंद्र नाखवाची गगन भरारी
