। उरण । वार्ताहर ।
करंजा येथील रयत शिक्षण संस्थेचे द्रोणागिरी हायस्कूल मराठी व इंग्रजी मध्यम शाळेच्यावतीने नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे नारळाची मोठ्या आकाराची प्रतिकृती बनवून त्याची पूजा केली जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक कोळी नृत्य सादर केले होते.
यावेळी सीताराम नाखवा, के.एल. कोळी, सरपंच अजय म्हात्रे, हर्षद कोळी, प्रदीप नाखवा, राजेंद्र कोळी या मान्यवरांच्या हस्ते नारळाच्या प्रतिकृतीची पूजा करून हार घालून वाजत गाजत तसेच लेझीम पथक व कोळी नृत्य सादरीकरण करत मिरवणूक काढण्यात आली होती. शेवटी नौकैतून नारळ सागरास अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह मुख्याध्यापिका सुरेखा म्हात्रे, एस.डी. कोळी, शिक्षकवर्ग, डॉ. ग्रीष्मा नाखवा, द्रोणागिरी ब्रास बॅन्ड पथक, दिनेश पवार, मनोहर कोळी, स्कूल कमिटी सदस्य, देविदास थळी, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ व कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .