। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल येथील पंढरीनाथ महारू सोनवणे हे एस.टी महामंडळ मुंबई विभागात वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. त्यांचा मुलगा जितेंद्र सोनवणे याने 2022 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. 2023 मध्ये मैदानी परीक्षा झाली व मार्च 2024 मध्ये मुलाखत पार पडली. बुधवारी (दि.10) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात एस.टी संवर्गात जितेंद्र सोनवणे यानी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून 303.50 इतके गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाचे घवघवीत यश संपादन केले. तसेच, त्यांनी आपल्या शहीद मामाचे स्वप्न पूर्ण केले.