। अलिबाग । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवाचा सन 2024-25 या लायन वर्षाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा बुधवारी (दि.10) जुलै रोजी स्वागत गेस्ट हाऊस किहीम-अलिबाग येथे पार पडला. याप्रसंगी जितेंद्र ठाकूर यांनी लायन्स क्लब मांडवाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
याप्रंसगी 8 नवीन सदस्यांनी शपथग्रहण केली. या पदग्रहण व शपथविधी सोहळ्यासाठी आषाढ वारीची थीम साकारली होती. समारंभासाठी माजी प्रांतपाल मुकेश तनेजा, द्वितीय उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, झोन चेअरपर्सन प्रीतम गांधी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी उमंग देसाई, डी.सी. साईट, ए.एस.एन. मूर्ती, जी.एम.टी.को.ऑरडीनेटर अनिल म्हात्रे, नयन कवळे, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी आदी मान्यवर विशेष पाहुणे लाभले होते. तसेच माजी अध्यक्ष अभिजित गुरव, आमिष शिरगावकर, अरविंद घरत, सुबोध राऊत, विद्या अधिकारी, जितेश्री ठाकूर, विनिता पाथरे, अमरेष शिरगावकर, प्रिति पाटील, सतीश म्हात्रे, कुणाल पाथरे, मोहन पाटील, मानसी पाटील, विलास पाटील, उज्वला पाटील, मृदुला राऊत, मोहिनी गुरव, समता राऊत, साक्षी शिरगावकर, गीता कुलपे, अजय आंगणे, नितीन दांडेकर, डॉ .राजेंद्र मोकल, वृंदा मोकल, सुहानी म्हात्रे, स्मितल शिरगावकर, हेमा घरत, निलेश खोत, चंद्रकांत मल्हार, विनायक खोपकर यांच्यासह सुधीर पुरो, सुनीता पुरो, रवींद्र म्हात्रे, रुतीका म्हात्रे, वैष्णवी खोपकर हे नवीन सदस्य तसेच लायन्स क्लब अलिबाग, अलिबाग डायमंड, लायन्स क्लब पोयनाड, श्रीबाग सेंटिनिअल, क्लबचे पदाधिकारी व सिनिअर सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी लायन्स क्लब मांडवाच्या नवीन सदस्यांचा शपथविधी व अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे पदग्रहण करण्यात आले. लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष ऋग्वेद ठाकूर, सचिव निकिता पाटील, खजिनदार प्रदीप पाटील यांनी आपापल्या पदाची सूत्रे हाती घेतली. याप्रसंगी एकूण 24 सदस्यांनी पदभार स्वीकारला. याच कार्यक्रमात लायन्स क्लब मांडवाने आपल्या कार्यक्षेत्रात मोहित मनोज गुरव (5000/-), अनुष्का हृषीकेश पवार (7000/-), स्वरा संजय भोष्टेकर (15000/-) या तीन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थ सहाय्य करून पुढील शिक्षणासाठी मोलाचे सहकार्य करून स्पॉट ऍक्टिव्हिटी यशस्वी केली.