| उरण । वार्ताहर ।
दीड वर्षापासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामकाज विश्वस्त पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 15 नोव्हेंबरला निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी एका पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे जेएनपीएमध्ये दिवाळीत प्रचाराची लगबग सुरू होणार आहे. सध्या जेएनपीएच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांची निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी जेएनपीटीऐवजी पोर्ट थोरिटीक्ट स्थापन झाला आहे. त्यामुळे जानेवारीपासून बंदराचे कामकाज थोरिटीक्टनुसारच सुरू आहे. प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. दरम्यान, निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्ही कामगार ट्रस्टीची मुदत वर्षापूर्वीच संपली आहे. त्यांना मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात निवडणूक घेणे अपेक्षित होते. केंद्रीय कामगार आयुक्तांनी 2 ऑगस्टला निवडणूक घेण्याचे निर्देशही दिले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्यांची त्यापूर्वी निवड न केल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विविध कामगार संघटनांच्या मागण्यांमुळे कामगार विश्वस्त पदाची निवडणूक 15 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली आहे.