| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार अलिबागमधील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी मिळाली असून, एका तरुणीला रोजगाराचे साधन खुले झाले आहे. सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
नाशिकेत गणतांडेल हे समाजकल्याण विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार, त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार नाशिकेत गणतांडेल यांची कन्या मोहिनी नाशिकेत गणतांडेल यांना नोकरी देण्यात आली आहे. शिक्षणानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार, गट ड पदावर सध्या त्या कार्यरत असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली.







