सत्तारांच्या विरोधात अलिबागमध्ये ‘जोडे मारो’ आंदोलन

अलिबागमध्ये राष्ट्रवादीकडून पुतळ्याचे दहन

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगड जिल्ह्यात सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर, अलिबाग येथील राष्ट्रवादी भवन समोर प्रतिकात्मक पुतळा जाळून सत्तारांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात असणार्‍या राष्ट्रवादी भवनासमोर कृषीमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात अलिबाग, मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, मानसी चेऊलकर, जयेंद्र भगत, लवेश नाईक, मनोज शिर्के, ऋषिकांत भगत, हेमनाथ खरसंबळे, मीनाक्षी खरसंबळे, नौसीन पटेल, हिम्मत पाटील, आशिक किरकिरे, नरेश पाटील, प्रसाद पाटील, महेश कवळे, उमेश पाटील, उमेश गावंड आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Exit mobile version