| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि मार्नस लाबुशेन अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर आहे. तर, जो रुट चौथ्या आणि कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताविरुद्ध नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 173 धावा करणार्या जो रुटने आयसीसी क्रमवारीत चौथे स्थान पटकाविले आहे. टॉप टेनमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रमावारीत मागे टाकले आहे. या यादीत जो रुट चौथ्या क्रमांकावर असून, विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंड विरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे पहिल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट घेणार्या जसप्रीत बुमराहला फायदा झाला आहे. जसप्रीत बुमराह टेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावर आहे.