जॉगिंगसाठीचे रस्ते, टेकड्या गजबजल्या

| नवीन पनवेल | वार्ताहर |

दोन दिवसांपासून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. पावसाळा संपल्याने आता कुडकुडवणाऱ्या गुलाबी थंडीत व्यायाम करण्याची मजा काही वेगळीच असते. सध्याचे वातावरण आरोग्याच्या दृष्टीनेदेखील पोषक असल्यामुळे पनवेल परिसरातील व्यायेामाची ठिकाणे, जिम व जॉगिंगसाठीचे रस्ते, टेकड्या गजबजू लागले आहेत.

पनवेल परिसरात असलेल्या विविध टेकड्या, डोंगर व वनखात्याच्या जमिनींमुळे आल्हाददायक वातावरण आहे. अशातच शहरातील विविध उद्याने, मोकळे भूखंड असल्याने आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी व्यायामासाठीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अशातच आता गुलाबी थंडीमुळे वातावरणातील हा बदल अनुभवण्यासाठीची गर्दी विविध ठिकाणांवर वाढू लागली आहे. कारण या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा अधिक प्रभावीपणे काम करत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने थंडीत व्यायाम करणे अधिक हितकारक ठरते. शिवाय हिवाळ्यात भूख चांगली लागते, पचनक्रिया सुधारत असल्याने सहसा आजारपण येत नसल्याने सकाळच्या प्रहरी पनवेल परिसरातील विविध उद्याने, टेकड्या, मोकळ्या रस्त्यांवर व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

Exit mobile version