पत्रकार मयूर तांबडेंचा सन्मान

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील पत्रकार मयूर गुरुनाथ तांबडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साई सन्मान पुरस्काराने रिटघर येथे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आई निवास, रिटघर येथे 14 एप्रिल रोजी श्री साईबाबा उत्सव आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुभाष भोपी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष भोपी, साई संस्थान वहाळचे रवी पाटील, क्रांतिकारी सेवा संघाचे नामदेव फडके, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, राजेश केणी, भारत भोपी, बबन विश्‍वकर्मा, देवेंद्र पाटील, अल्लौद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटिल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version