पंढरपूर । प्रतिनिधी ।
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी ठाणे जिल्हा कमिटीच्या जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे आणि त्याची कार्यकारणी यांची बैठक घेऊन महत्वाच्या विषयावर चर्चा केली. याच दरम्यान ठाणे जिल्हा कमिटीवर पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय साळवे, प्रवीण राणे, मुन्ना खंडेलवाल अॅड. बाबू खंडेलवाल,विजय सिंग,जगदीश देवानी भरत सणस,सत्येन्द्र पांडे, प्रमोद हरपुडे यांची नियुक्ती करण्यात आली .
अंबरनाथ तालुका समितीचे अध्यक्ष अशोक नाईक याना पदोन्नती करून तालुका प्रभारी पद देऊन त्यांच्या अधिपत्याखाली तालुका अध्यक्ष अजय चिरिवेल्ला सचिव बबलू चक्रवर्ती कार्याध्यक्ष वामन उगले आणि खजिनदार संतोष तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेश संघटक राजेश मापरा,माजी कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण उपस्थित होते. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम वाघ,जाफर वणू,सरचिटणीस मनोज जैन,उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई,रशीद शेख तानाजी लोणे,काळुराम भोईर,बाळू बोन्द्रे सुनील फर्डे,अशोक शिरसाट,सलीम मन्सुरी, सुरेश जगताप,व्यंकटेश राव राजेश फक्के हरी चंदर आल्हाट,ब्रिजेश श्रीवास्तव,जगनसिंग राजपूत सह अनेक पत्रकार उपस्थित होते.