| रसायनी | वार्ताहर |
लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दिक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा 28 जुलैपासून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघाली असून 19 ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रा रायगड जिल्ह्यातील सकाळी 10:30 वाजता खालापूर तालुक्यातील खोपोली शिलफाटा येथे दाखल होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधून समर्थंन मिळविण्यात येणार आहे. पुढे ही संवाद यात्रा पनवेलकडे जाणार असल्याने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांची जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे, नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण, पदाधिकारी किरण बाथम यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शासकिय विश्रामगृहात चर्चा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी सांगितले की पत्रकार संवाद यात्रा ही रायगड जिल्ह्यातील खालापूर व पनवेल तालुक्यातून जात असल्याने या तालुक्यांच्या कमिटीने अधिक लक्ष घालून नियोजन करावे. या संवाद यात्रेला यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हातील पत्रकार बांधव परीश्रम घेतील. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खालापूर व पनवेल तालुक्यातील कार्यकारीणी 19 ऑगस्टची पत्रकार संवाद यात्रा यशस्वी करणार असल्याचे पनवेल तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी सांगितले.
सकाळी खोपोली- शिलफाटा शिवस्मार काला पुष्पहार अर्पंण करुन पत्रकारांकडून सन्मान, अष्टविनायक क्षेत्रातील महड वरदविनायक दर्शंन व सत्कार सोहळा आणि संघटनेच्या पत्रकारांची ओळखपरेड असे पत्रकार संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.