पत्रकार शैलेश पालकर यांचा सन्मान

| पोलादपूर | प्रतिनिधी |
ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 16 व्या अधिवेशनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर आणि शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचा मान्यवरांच्य ाहस्ते दुसर्‍या सत्रांत सत्कार करण्यात आल्याने रायगडचा ठसा या अधिवेशनावर उमटलेला दिसून आला. याप्रसंगी सरचिटणीस विश्‍वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळये, वृत्तवाहिनी संघाचे प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून 500 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांनी मानले.

Exit mobile version