पत्रकार मंचाचा अभ्यास दौरा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून सुपरिचित असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची नवनिर्वाचित वार्षिक कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. मंचाच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शिंगणापूर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि.13 व 14 मार्च रोजी संपन्न झालेल्या दौऱ्यामध्ये सदस्यांना कीटचे आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून वंचित, दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंच सातत्याने कार्यान्वित राहिलेला आहे. मंचातील सर्व सदस्यांना पदाधिकारी म्हणून कार्य करता यावे याकरता पनवेल तालुका पत्रकार विकास मंचामध्ये नामनिर्देशनाद्वारे एकमताने वार्षिक कार्यकारणी निवड केली जाते. नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व सदस्य वर्षाची सुरुवात शिर्डी व शिंगणापूर येथे श्री साईबाबा तसेच श्री शनेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करत असतात. शिर्डी येथील भव्य ऑडिटोरियम मध्ये अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तमाम सदस्यांना ओळखपत्रे, गाडीवर लावायचे स्टिकर्स आणि वार्षिक किटचे वाटप केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, खजिनदार दत्ता कुलकर्णी, उपसचिव राजू गाडे, सदस्य लालचंद यादव यांची उपस्थिती होती.

Exit mobile version