युक्रेनमध्ये अडकलेल्या कल्पितचा संकटातून प्रवास

। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगडातील पेण येथील कल्पित मढवी हा प्रत्यक्ष युद्ध सुरु असलेल्या सुमी येथे अडकून पडला होता. त्यामुळे त्याला तेथून बाहेर पडणे अशक्य झाले होते. रशियाच्या सैन्याने सुमीचा ताबा घेतल्यानंतर कल्पित आणि इतर भारतीय विद्यार्थी असलेल्या इमारतीवर खुण करुन तेथे कोणताही त्रास देण्यात आला नसल्याचे त्याच्या वडिलांनी कृषीवलला सांगितले. मात्र मागील काही दिवसांपासून कल्पितला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अन्न धान्य तसेच पाण्याचा साठा देखील संपल्यामुळे उपासमारीची वेळ देखील आली होती. मात्र सुदैवाने पोचहलेल्या रेड क्रॉसच्या पथकाने अन्न धान्य तसेच पाण्याचा पुरवठा केल्याने त्यांची उपासमार टळली. तर रात्री विजेविना रहावे लागत होते त्याचप्रमाणे इंटरनेट देखील विस्कळीत झाल्याने संपर्क साधणे देखील कठिण झाले होते. सुमी हे शहर रशियाच्या सिमेपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरच आहे. आता कल्पित आणि त्याचे इतर भारतीय सहकारी सुमीमधून बाहेर पडून रोमानियाच्या सिमेजवळ ट्रेनमधून पोहचले आहेत. त्यामुळे आता एक दोन दिवसातच ते मायदेशी परततील अशी माहिती सुधीर मढवी यांनी दिली.

Exit mobile version