रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत जेएसडब्ल्यूची वाहतूक गोवा गेटने करावी

शेकाप नेते पंडित पाटील यांची सुचना
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रस्ता नादुरुस्त असेपर्यंत जेएसडब्ल्यू कंपनीने गोवा गेटने वाहतूक सुरु ठेवली तर त्याचा ताण वाहतूकीवर देखील येणार नाही. हा रस्ता पुर्ण होईपर्यंत रायगड जिल्हा प्रशासनाने कंपनीला तसे पत्र देऊन तशी वाहतूक सुरु करण्याच्या सुचना तात्काळ द्याव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली. अलिबाग वडखळ हा रस्ता पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यानंतर तो प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागकडे वर्ग केला. त्यानंतर पुन्हा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केला. आता नेमका रस्ता कोणाच्या ताब्यात आहे आणि त्याचे अधिकारी कोण आहेत याची माहिती जनतेला असणे आवश्यक आहे. त्यासाठी माहितीचे फलक संपर्क क्रमांकासह रस्त्यावर लावण्याची मागणी देखील पंडित पाटील यांनी केली आहे.

अलिबाग वडखळ रस्त्याचा खो खो महाराष्ट्र आणि केंद्र सरकार कधी थांबवणार आहे. कधी सांगतात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यानंतर सांगतात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तर कधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता कोणाकडे आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे. अलिबाग वडखळ रस्त्याप्रमाणेच अलिबाग पनवेल बायपास रस्त्याची देखील मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती कधी केली जाणार आहे. मोठ मोठया खड्डयांमुळे रात्री अपरात्री या मार्गाने प्रवास करीत असताना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढुन सदर रस्त्याची सद्यस्थितीत काय परिस्थीती आहे. रस्ता कुणाकडे आहे? तो कधी पुर्ण होणार आहे? त्यात अडचणी काय आहेत याची माहिती देखील सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.

अलिबाग वडखळ रस्त्यावर जेएसडब्ल्यूची वाहतूक होतेच त्याचप्रमाणे इतर वाहतूक देखील होते. मात्र 80 टक्के वाहतूक जेएसडब्ल्यू कंपनीची आहे. आरसीएफ, एचपीसीएल आदींची देखील अवजड वाहतूक या मार्गाने होते. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शासकीय कामे असतात, रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. कोर्टात तारखा असतात. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक ही सात वाजल्यानंतर बंद करावी अशी मागणी आपण सातत्याने करीत आहोत. मात्र जिल्हा प्रशासन त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. एचपीच्या गॅसच्या अवजड गाड्यांना एक वेळ देऊन सकाळी सात वाजेपर्यंत परवानगी द्या. वडखळ नाक्यावर या गाड्या सातनंतर बाजूला लावण्याच्या सुचना द्याव्यात. त्यामुळे जनतेला देखील त्रास होणार नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे ठिकाण आहे. देशातील एकमेव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे की जे चार पदरी रस्त्याने जोडलेले नाही. या रस्त्यावर साळाव येथील जेएसडब्ल्यूची वाहतूक आहे, एचपीची वाहतूक आहे. आरसीएफची वाहतूक आहे. पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक आहे. असे असताना केंद्र आणि राज्य सरकार या रस्त्याकडे का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

असंख्य गाड्या, जेएसडब्ल्यू, आरसीएफ कंपन्या आपल्या वाहतूकीतून हजार कोटयवधी रुपयांचा नफा कमवतात. या नादुरुस्त रस्त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यांची वाहने खराब झाली आहेत. त्यांना वेळेत रुग्णालयात उपचारासाठी जाता येत नाही. अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विरार कॉरिडॉर रस्ता होईल तेंव्हा होईल पण सध्या हा रस्ता खड्डे मुक्त करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त पाऊस पडेल असे जाहीर केले आहे. असे असताना रायगड जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन झोपले आहे का? असा सवाल करीत त्यांनी केला.

यापुढे जिल्ह्यात सिमेंट क्राँकिटचे करावेत
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जीएसटीच्या रुपाने सर्वात जास्त कर देणारा जिल्हा आज रायगड आहे. धाटाव एमआयडीसी, महाड एमआयडीसी, निजामपूर, तळोजा तसेच याच मार्गावरुन जावे लागणारी चिपळूण एमआयडीसी देखील आहे. तसेच पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने डांबरी रस्ते टिकत नाहीत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात यापुढे रस्ते सिमेंट क्राँकिटकरणाचे बनवावे. म्हणजे यापुढे जनतेला त्रास सहन करावा

Exit mobile version