| रायगड | खास प्रतिनिधी |
पत्नी आणि सासूच्या हत्ते प्रकरणी पाेलीसांनी अटक केलेल्या मयूरेश गंभीरला न्यायालायाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गंभीर याची आज पाेलीस काेठडीची मुदत संपल्याने त्याला उरण पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
दुसरी पत्नी प्रिती हिला ठार मारल्याचे तसेच याच गुन्ह्यात फिर्यादी असणारी प्रितीची आई भारती आंबाेरकर यांचा देखील खून केल्याची कबुली मयुरेशने पोलिसांना दिली होती. त्याला उरण पाेलीसांनी डाेंबीवली पूर्व येथील पलावा भागातून ताब्यात घेतले होते.