जुगाड्या सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित

अलिबाग मधील अनेक कलाकारांचा सहभाग

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ध्येय गाठताना संकटांना सामोरे जाणार्‍या तरुणाची रंजक कथा असणारा जुगाड्या मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अलिबागमधील अनेक कलाकारांचा अभिनव पहावयास मिळणार आहे. 14 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. जुगाड्या चित्रपटात कथा, संवाद लेखन, कलाकार आणि निर्माता अशा महत्वाच्या भूमिका बजावणारे संदेश (आप्पा) पालकर यांनी चित्रपट प्रदर्शनाची माहिती दिली.

चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण अलिबाग तालुक्यात करण्यात आली असून विशेष करून नांगरवाडी गावात आणि मुंबईत करण्यात आले आहे. दिग्दर्शन नरेंद्र ठाकूर यांनी केले, तर पटकथा सुनील धुमाळ व नरेंद्र ठाकूर यांनी लिहिली आहे. चित्रपटाला विक्रांत वार्डे यांनी सुमधुर संगीत दिले आहे. चित्रपटामध्ये दीपक अंगेवार आणि महेश नायकुडे यांनी गीते लिहिली आहेत. कोरीओग्राफी भरत जाधव व मयुरेश पाटील यांची आहे. रोहित राऊत, वैशाली सामंत, मीरा कारलेकर, अक्षय ठाकूर, लीनाक्षी शेडगे हर्षल पाटील, विक्रांत वार्डे, भूमी काळबेरे, आर्यन पडवळ आदी गायकांनी पार्श्‍वगायन केले आहे. तर संकलन सुबोध नारकर यांनी केले असून छायाचित्रण स्वप्नील मनवल यांनी केले आहे. कला दिग्दर्शन गणेश म्हात्रे आणि सत्यन पवार याने केले आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कलाकार राजू खेर यांनी प्रथमच मराठी मध्ये खलनायकाची भूमिका केली असून चैतन्य सरदेशपांडे, जुईली टेमकर, जयराज नायर, सुदेश म्हसिलकर, प्रणव रावराणे, मयूर पवार, प्रदीप वाळके, राजेंद्र जाधव, वैशाली जाधव, सुषमा चव्हाण, करिष्मा सैनी, मुकेश पाटील हे प्रमुख भूमिकेत असून अलिबाग तालुक्यातील अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

Exit mobile version