| अलिबाग | प्रतिनधी |
किहीम अलिबागचे रायगडभूषण प्राप्त कलाकार योगेश भिकाजी पवार यांना कलाक्षेत्रातील प्रदीर्घ कामगिरीसाठी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चॅनल, कर्जत यांच्या ‘महाराष्ट्र माझा कलारत्न पुरस्कार 2023’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील 40 व्यक्तींचा सन्मान झाला. महाराष्ट्र माझा 24 तास बातमी या न्यूज चॅनल संपादक जगदीश दगडे यांच्या विचारातून हा सन्मान सोहळा घडविण्यात आला होता.
योगेश पवार रायगडमध्ये विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटक, शॉर्ट फिल्म, पथनाट्य, ऑर्केस्ट्रा, यू ट्यूबच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मराठी चित्रपट दगडी चाळ 2, पुनश्च हरि ओम, गुलमोहर अश चित्रपटात तर झी मराठी- तुला पाहते रे, स्टार प्रवाह – दुहेरी या सोबतच यूट्यूबर विनायक माळी यांच्यासोबतसुद्धा अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. तसेच रितेश देशमुख यांच्या वेड चित्रपट असो, झी टॉकीजचा पुनश्च हरि ओम चित्रपट असो अशा अनेक चित्रपटांसाठी कास्टींगचे काम करून अनेक हौशी लोकल कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली आहे.