। नेरळ । प्रतिनिधी ।
मुस्लिम धर्मियांच्या ईद ए मिलाद या पवित्र सणानिमित्त नेरळ गावात जुलूस मिरवणूक काढण्यात आली. नेरळ गावातील आणि परिसरातील मुस्लिम धर्मीय या मिरवणुकीत सहभागी झाले होते.दरम्यान, शेकडो तरुण या जुलूस मिरवणुकीत सहभागी होत शांततेत मिरवणूक निघाली. मरवणुकीत नेरळ मधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुस्लिम धर्मियांना भेटून ईद ए मिलाद च्या शुभेच्छा दिल्या.तर नेरळ खांडा मैदान येथून निघालेली जुलूस मिरवणूक स्टेशन रोड मार्गे नेरळ बाजारपेठ येथे पोहचली. माथेरान रस्त्याने हि मिरवणूक सम्राट नगर येथे विसर्जित झाली असून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी सहभाग घेतला. मुस्लिम धर्मियांच्या वतीने जेष्ठ नेते जैद नजे,माजी सरपंच आयुब तांबोळी,यांचयसह जेष्ठ नेते लियाकत सहेंद,तहेसिन सहेंद,इस्माईल शेख,सलीम तांबोळी,आष्पक तांबोळी,शोएब जळगावकर,असिफ अत्तार,नाजीम अत्तार, नोमान नजे, जाफर शेख,यांच्यासह तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नेरळमध्ये जुलूस मिरवणूक
