| रसायनी | वार्ताहर |
तुपगाव चौक येथे ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहाने संपूर्ण तुपगाव मोहल्ल्यात जुलूस काढून साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुले, स्त्रिया पुरुष मोठ्या संख्येने जुलूसमध्ये सामिल झाले होते.
हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो. कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ते अल्लाहचे प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने कुराण हा धर्मग्रंथ त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत पोहचवला. अतिशय उत्साही वातावरणात, शांततेत जुलूस संपुर्ण तुपगाव मोहल्ल्यात फिरून पवित्र जामा मशीद येथे आल्यावर उपस्थित वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, सपोनि मनीष मोरे, सपोनिरीक्षक पवार, ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव सरपंच रविंद्र कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थित मान्यवर यांचे जामा मशीदच्यावतीने यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मान्यवरांनी शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. लहान मुलांना खाऊ वाटण्यात आला. तसेच यावेळी खीर वाटण्याचा कार्यक्रम झाला.