माथेरान घाटातील जुम्मापट्टी धबधबा वर्षासहल प्रेमींचे आकर्षण

| कर्जत | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान घाट रस्त्यात जुम्मापट्टी येथे असलेला धबधबा हजारो वर्षासहल प्रेमींचे हक्काचे ठिकाण झाला आहे. सुरक्षित ठिकाण असल्याने आणि जाणे सहज शक्य असल्याने पावसाळ्यात चार महिने त्या ठिकाणी पर्यटक देखील गर्दी करून असतात.माथेरान ला येणार बहुतेक पर्यटक तेथे दहा मिनिटे थांबून तेथील निसर्ग न्याहाळतो आणि नंतरच पुढे जात असतो. तर धबधबा प्रेमी हे सातत्याने माथेरान घाटातील जुम्मापट्टी धबधबा येथे शेकडोच्या संख्येने वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.

माथेरानच्या डोगरातून विविध भागात असंख्य धबधबे धबाबा करीत कोसळत असतात. मात्र त्यातील बहुतेक धबधब्यांवर कोणाला जाणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी कोणी जात नाही . परंतु कर्जत तालुक्यातील काही सुरक्षित धबधबे यांच्यात जुम्मापट्टी येथिल धबधबा ओळखला जातो. नेरळ- माथेरान घाट रस्त्यावर लागून असल्याने या धबधब्यावर माथेरान कडे जाणारे पर्यटक प्रामुख्याने काही वेळ थांबून पुढे जायचे. त्यावेळी टॅक्सी तेथे थांबून पर्यटक धबधब्याजवळ जाऊन पाण्याचे तुषार अंगावर घेऊन पुढे माथेरान गाठत. मात्र, मागील काही वर्षात वर्षासहलींची टूम आली आणि कर्जत तालुक्यातील धबधब्यांवर प्रचंड पर्यटक येऊ लागले. त्यातील मोठ्या प्रमाणात पर्यटक हे नेरळ- माथेरान घाट रस्त्यावरील जुम्मापट्टी धबधबा हा पर्याय निवडतांना दिसले आहेत. पावसाळा सुरु झाला कि आठ दिवसात जुम्मापट्टी हा धबधबा वाहू लागतो,त्यावेळी अन्य ठिकाणी असलेले धबधबे हे कोरडे असतात.माथेरानच्या डोंगरात फार लवकर पाऊस सुरु होता आणि तात्काळ डोंगरात हिरवाई ने त्या भागात हिरवा शालू सजलेला दिसून येतो. त्याचा आनंद घेण्यासाठी आणि मध्येच झाडांमधून येणारे ढग असे अविस्मणीय क्षण जुम्मापट्टी धबधबा येथे आहे.

अशा या घाट रस्त्यात असलेल्या सुरक्षित धबधबा कुटुंबासह वर्षासहली साठी येणारे पर्यटक यांच्यासाठी हा धबधबा अत्यंत सुरक्षित आहे.कारण या धबधब्याला लागून एक लहान धबधबा आहे आणि त्याठिकाणी महिला आणि मुली वर्षासहलीचा आनन्द घेतात. त्या ठिकाणी वर्षासहली साठी येणारे पर्यटक यांच्यासाठी मक्याचे कणीस,वाफाळलेला चहा यांची सोय तेथील आदिवासी लोकांनी झोपडी बांधून पर्यटकांची सोय केली आहे. तर जुम्मापट्टी येथील दोन ठिकाणी सुग्रास भोजनाची व्यवस्था आदिवासी लोक करीत असतात.त्या ठिकाणी पोहचण्यासाठी नेरळ येथून जाता येते.

Exit mobile version