| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान याठिकाणी जाण्यासाठी असलेल्या घाटरस्त्यावरील जुम्मापट्टी येथे एक धबधबा आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर हा धबधबा प्रवाहित होत असतो आणि त्यानंतर नेरळ-माथेरान घाटरस्त्याने जाणाऱ्या पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करीत असतो. यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर धबधबा प्रवाहित झाला आहे.
26 मे रोजी मुसळधार पाऊस झाला आणि बहुतांश नद्यांना महापूर आले. त्या पूर्व मौसमी पावसामुळे माथेरानच्या डोंगरातून विविध भागांत असंख्य धबधबे वाहू लागले. मात्र, त्यातील बहुतेक धबधब्यांवर जाणे शक्य होत नाही. मात्र, कर्जत तालुक्यातील काही सुरक्षित धबधब्यांपैकी जुम्मापट्टी येथील धबधबा आहे. हा धबधबा नेरळ-माथेरान घाट रस्त्याला लागून असल्याने माथेरानकडे जाणारे पर्यटक प्रामुख्याने काही वेळ याठिकाणी थांबून पुढे जातात. तसेच, माथेरानच्या डोंगरात फार लवकर पाऊस सुरु होता आणि डोंगरात हिरवाई पसरते. तसेच, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके देखील जमा होत असतात. अशा अविस्मणीय क्षणांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक जुिम्मापट्टह धबधब्यावर थांबत असतात. त्यामुळे स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो.







