कबड्डी स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाचा विजय

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी अलिबाग जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाचा दणदणीत विजय झाला.

ग. बा. वडेर हायस्कूल व ब. ग. ओसवाल ज्युनिअर कॉलेज पाली व जिल्हा क्रीडा विभाग अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत 19 वर्ष वयोगट मुलांमध्ये मध्ये पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा पातळी वर आपला दबदबा कायम ठेवला आहे. सर्व विजयी स्पर्धकांचे आणि क्रीडा प्रशिक्षक तेजेश म्हात्रे यांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य निशिकांत कोळसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version