| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 53 वे सरन्यायाधीश म्हणून सोमवारी (दि. 24) शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात न्यायमूर्ती सूर्यकांत यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे कामकाज पाहतील.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणं, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणं, बिहार मतदार यादी प्रकरण तसेच पेगासस स्पायवेअर प्रकरण आदी ऐतिहासिक निकाल दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 30 ऑक्टोबरला पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 15 महिने या पदावर राहतील. 9 फेब्रुवारी 2027 रोजी वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त होतील. सोमवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.







