। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांनी शनिवारी (दि.27) शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राष्ट्रपती भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न्यायमूर्ती लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश बनले आहेत. या शपथविधी सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वांच्या प्रकरणांचा निकाल लागणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.