अल्पवयीन कार चालकाचा महिलेस चिरडण्याचा प्रयत्न

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुण्याजवळील आळंदीत एका अल्पवयीन मुलाने जुन्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आळंदीजवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथे जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या अल्पवयीन कार चालकने आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेतली. त्यानंतर भरधाव वेगाने कार चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.

त्यानंतर त्याने कारच्या छतावर बसून शिवीगाळ केली. या प्रकरणी आळंदी पोलिसांत महिलेने म्हणजेच नाजुका थोरात यांनी गुन्हा दाखल केल्याने अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

Exit mobile version