खेर्डीत राष्ट्रवादी युवक-युवती कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

। चिपळूण । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी युवक-युवती काँग्रेस, खेर्डी आयोजित आमदार शेखर निकम व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते पार पडला.

ही स्पर्धा 4 ते 6 मार्चदरम्यान खेळविली जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत चिपळूण अर्बन बँक संचालक अनिल दाभोळकर, सुनील दाभोळकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या व रत्नागिरी जिल्हा बँक संचालक दिशा दाभोळकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, चिपळूण पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, पंचायत समिती सभापती रिया कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. राकेश चाळके यांच्यासह सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version