। चिपळूण । वार्ताहर ।
युवक काँग्रेसच्या निवडणुकीत चिपळूनातील चौघांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून युवकांनी अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. नवनिर्वाचित युवक पदाधिकार्यांनी पक्षवाढीसाठी योगदान दिले पाहिजे असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी नवनिर्वाचित युवक पदाधिकार्यांना सत्कारप्रसंगी दिला.
युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोनललक्ष्मी घाग, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांची नुकतीच निवड झाली आहे. यावेळी चिपळूण काँग्रेसचे प्रशांत यादव, लियाकत शाह, सुधीर शिंदे, इब्राहिम दलवाई, कबीर काद्री, सफा गोठे, अन्वर जबले, मैनुद्दीन सय्यद, महादेव चव्हाण, भरत लबढे, सुरेश पाथरे, मस्तान सय्यद, वासुदेव मेस्त्री, यश पिसे, इम्तियाज कडू, मन्सूर घारे, रुपेश आवले, राकेश दाते, गुलजार कुरवले आदी उपस्थित होते.