कबड्डीपटू काशीनाथ थळे यांचे निधन


। अलिबाग । वार्ताहर ।
मेढेखारगावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू, नाट्यकलावंत, एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व काशीनाथ महादेव थळे यांचे दि.5 जून रोजी निधन झाले. त्यांनी रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे कर्णधार बनून नेतृत्व केले आहे. पुणे विद्यापीठातून खेळताना त्यांनी आंतरराष्ट्रीय किर्ती कबड्डीमध्ये प्राप्त केली होती. महाराष्ट्रात कबड्डीमध्ये रायगड जिल्ह्याचा दरारा निर्माण करणारे काशीनाथ, परशुराम व राम या तीन थळे बंधुंपैकी काशीनाथ थळे यांना काळाने हिरावून नेले आहे. विकास मेढेखार संघातून खेळताना अष्टपैलू खेळ करुन संघाला अनेकदा विजेतेपद मिळवून देणारे काशीनाथ थळे हे मेढेखारच्या हौशी रंगभूमीवर अनेकदा नाट्य भूमिका साकार करुन नाट्यकलावंत म्हणुनही गाजले आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी देवयानी, पुत्र राहुल, सुनबाई श्रद्धा, तीन मुली, जावयी असा परिवार आहे. त्यांचा दहावा 14 जून रोजी व तेरावे 17 जून रोजी मेढेखार इथे होणार आहे.

Exit mobile version