। नागोठणे । वार्ताहर ।
कुर्डुस गावातील कबड्डीचा सहस्त्रपैलू झुंजार खेळाडू विकास पांडुरंग थळे यांचे मंगळवारी (दि.8) निधन झाले. त्यांच्या निधनाने कुर्डुस पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. विकास थळे यांनी सुमारे चाळीस वर्षे कबड्डीवर अधिराज्य गाजवले आहे. महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक संघातही त्याची निवड झाली होती. विकास थळे यांचे उत्तरकार्य रविवारी (दि.20) कुर्डुस येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.