। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुका बौद्धजन पंचायतच्यावतीने 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सुधागड तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव एकत्रित येत शनिवारी (दि.12) धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. या दिवशी 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त स्मारकामध्ये भंते विमल रत्ने यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितीन गायकवाड, भगवान शिंदे, मनोहर मोहिते, विजय जाधव, अभय गायकवाड, महेंद्र कांबळे, राजेश गायकवाड, नितीन जाधव, अमित गायकवाड, सुनील गायकवाड, दीपक पवार, रवींद्रनाथ ओव्हाळ, राहुल कांबळे, भीम महाडिक, आनंद जाधव, दिलीप मोरे, छनक शिर्के, दिलीप जाधव, नूतन शिंदे, वंदना गायकवाड, नीता कांबळे, अस्मिता कांबळे, कीर्ती कदम, प्रियंका ठवरे, श्वेता जाधव, वनिता शेलार आदी उपस्थित होते.