। माणगाव । प्रतिनिधी ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स महाड महाविद्यालयाचे 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे द्वितीय मूल्यांकन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बेंगळुरूच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयाला बी प्लस मानांकन प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल बोलताना दप्राचार्य सुदेश कदम यांनी कॉलेजच्या संपूर्ण टीमबद्दल अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली. हे ‘बी प्लस’ नामांकन महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचा दाखला आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षणपूरक वातावरण देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. ही कामगिरी भविष्यातील संधी आणि उच्च दर्जा प्राप्त करण्यास प्रोत्साहित करेल, असे मत कदम यांनी मांडले.