कबड्डीपटू सिद्धीने जिंकले कांस्यपदक

| खारेपाट | वार्ताहर |

70 वी वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2023 लर्मिन टेक स्किल युनिव्हर्सिटी रुपनगर पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झालेली विशेष म्हणजे दिलखुश आवास संघाची कबड्डीपटू सिध्दी शैलेश नाखवा हिने कांस्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करताना तिने ही कामगिरी केली.

दरम्यान, उपउपांत्य पूर्व फेरी सामन्यात महाराष्ट्राने गोवा संघाचा 34-24, उपांत्य फेरी सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा 39-30 असा पराभव केला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी दिलखुश आवास संघाची कबड्डीपटू सिद्धी नाखवा हिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिचे ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा राणे, माजी सरपंच अभिजित राणे, माजी पंचायत समिती सदस्य व ज्येष्ठ खेळाडू रणजित राणे, ग्रामस्थ व दिलखूश क्रीडा मंडळ आवास सर्व सदस्य, सभासद, संघाचे परीक्षक संदेश वर्तक, व्यवस्थापक अभिजित गुरुव, वेश्वी ग्रामपंचायत सदस्या रसिक मगर आणि रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version