प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा

कर्नाळा स्पोर्ट्सने मारली बाजी

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पनवेल आयोजित प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि.14 रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रथम क्रमांक कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, द्वितीय क्रमांक टाकादेवी मांडवा, तृतीय क्रमांक ऋतिका स्पोर्ट्स पेण, चतुर्थ क्रमांक सुवर्ण गणेश दिवे आगार यांनी पटकावला. या स्पर्धेत पब्लिक हिरो निमिषा पाटील, उत्कृष्ट पकड मानसी गायकवाड, उत्कृष्ट चढाई वेदिका आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ऋतुजा पाटील ठरले.

तर पुरुष कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक वायुसुत ओढानंगी, द्वितीय क्रमांक पांडबादेवी रायवाडी, तृतीय क्रमांक नवतरुण कारावी, चतुर्थ क्रमांक जय हनुमान वाशी-रोहा यांनी पटकावला. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू जितेश पाटील, उत्कृष्ट चढाई केदार लाल, उत्कृष्ट पक्कड विपुल मोकल आणि पब्लिक हिरो मितेश पाटील ठरला.
अत्यंत अटी-तटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या या कबड्डी स्पर्धेने अनेकांची मने जिंकली. या स्पर्धेत 24 पुरुष संघ आणि आठ महिला संघ सहभागी झाले होते. या कबड्डी सामना दरम्यान प्रो कबड्डी लीग स्टार निलेश शिंदे यांची उपस्थिती लाभली.

Exit mobile version