जय मल्हार मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा

नवतरुण कारावी संघ विजयी

| सोगाव | वार्ताहर |

जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ अंतोरे, पेण यांनी शुक्रवारी (दि.9) रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मर्यादित व आमंत्रित संघांचे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचे जय मल्हारचे भव्य मैदानावर आयोजन केले होते. या जय मल्हार अंतोरे पेण आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेत नवतरुण कारावी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्री हनुमान बोरी संघाने पटकावला, तृतीय क्रमांक नवकिरण भेंडखळ संघाने पटकावले, तसेच चतुर्थ क्रमांक शिवशंभो पाटणेश्‍वर संघाने पटकावले. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिथुन मोकल याला देण्यात आला, तर उत्कृष्ट पक्कड म्हणून सिद्धार्थ ठाकूर या सन्मानित करण्यात आले. तसेच, उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू म्हणून निखिल म्हात्रे गौरविण्यात आले, तर पब्लिक हिरो म्हणून यश पाटील याचा गौरव करण्यात आला. स्पर्धा पाहण्यासाठी पेण तालुक्यासह इतर तालुक्यातील मान्यवर नागरिक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील किहीमचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Exit mobile version