| मुंबई | वृत्तसंस्था |
सचिंद्र आयरे फाऊंडेशन व लालबागचा राजाच्या आशिर्वादाने शिवडी विधानसभा मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार आणि रविवार (01 व 02 जून 2024) रोजी कबड्डी खेळाचे दोन दिवसांचे “विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे“ आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबिर फक्त प्रथम येणाऱ्या 9 ते 14 वर्ष वयोगटातील 50 मुलांकरिता असेल. हे शिबिर लालबाग येथील मनोरंजन मैदान, गुंढेचा पार्क, गॅस कंपनी लेन येथे सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत घेण्यात येणार आहे. ज्या मुलांना या शिबिरात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज, आधार कार्डच्या नकल प्रत सोबत 28 मे पर्यंत संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत खालील दिलेल्या भ्रमणध्वनीशी संपर्क साधून जमा करावेत. (अशोक लोटणकर – 7738703405, दीपक मसुरकर – 9869145916, नितीन घाग – 9819225199, सचिंद्र आयरे – 9020817749) असे आवाहन एका परिपत्रकाद्वारे सचिंद्र आयरे यांनी प्रसार माध्यमातून सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना केले आहे.