शिरगाव कबड्डी स्पर्धेत कडसुरे विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री साईनाथ कबड्डी मंडळ शिरगाव मुरुड यांच्या वतीने जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ चोंडेश्‍वरी कडसुरे हा ठरला. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख रक्कम 20 हजार रु व आकर्षक चषक,तर उपविजेता मानकरी चिंचमाता बोर्ली पंचतन या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक दर्यावर्ती नागाव बंदर संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमाक श्री दत्त प्रसन्न किहीम या संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू निलेश शिर्के( कडसुरे) उत्कृष्ट चढाई राज (बोर्ली पंचतन) उत्कृष्ट पक्कड सिद्दीक पनवेलकर(दर्यावर्ती नागाव बंदर) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version